12 वी परीक्षेत रक्षा गोपाळ प्रथम

0

नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा (सीबीएससी) 12 वीचा निकाल रविवारी सकाळी जाहिर झाला. सीबीएससीच्या 2017 च्या बारावीच्या परीक्षेत नोएडा येथील अ‍ॅमीटी इंटरनॅशनल स्कुलच्या कुमारी रक्षा गोपाळ हिने प्रथम क्रमांक मिळवला आहे. रक्षाला 99.6 टक्के गुण मिळाले असून चंदीगढ येथील भूमी सावंत ही 99.4 टक्के गुण मिळवून दुसरी आली आहे. सीबीएससी बारावी परीक्षेत यावर्षीदेखील मुलींनी बाजी मारली आहे. एकुण निकाल 82 टक्के लागला आहे.

सीबीएससीच्या बारावी परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवणार्‍या रक्षा गोपाळ हिने इंग्रजी, राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र या विषयात प्रत्येकी शंभरपैकी शंभर गुण मिळवले आहेत. तर इतिहास आणि मानसशास्त्रात तिने अनुक्रमे 99 गुण मिळवले आहेत. दिल्ली विद्यापीठात राज्यशास्त्र विभागात पुढील शिक्षण घेण्याचा रक्षाचा मानस आहे. सीबीएससीचा यावर्षीचा बारावीचा एकुण निकाल 82 टक्के लागला आहे. मागील वर्षी तो 83.05 होता. त्यामुळे यावर्षी एकुण निकालाची टक्केवारी कमी झाल्याचे दिसून येत आहे.