12 व 11 दिवसीय उपवासाची सांगता

0

शिरपूर । शहरातील विजय जैन आणि त्यांच्या पत्नी श्रद्धा जैन यांच्या 12 दिवसीय व पंडित मनोज जैन यांचे सुपूत्र प्रणव जैन यांच्या 11 दिवसीय उपवासाची सांगता धार्मिक विधीने करण्यात आली. श्रद्धा जैन व प्रणव जैन यांचा पारणाचा कार्यक्रम त्यांच्या घरीच आयोजित करण्यात आल्याचे संयोजकांनी सांगितले. बुधवारी तारणतरण जैन मंदिरापासून पालखीसह तपस्यार्थींची शोभायात्रा काढण्यात आली. मंदिरापासून निघालेली शोभायात्रेत शहरातील बालाजी रोड, आंबा बाजार, मारवाडी गल्ली मार्गाने जैन चैत्यालयात दाखल झाली. येथील नुतन जैन स्थानकातील साध्वीश्रीं शासन दिपीका पूज्यश्रीजी पावनश्रीजी म.सा, प्रशांतश्रीजी म.सा., प्रेक्षाश्रीजी म.सा., प्रणव श्रीजी म.सा. आदी साध्वींच्या प्रमुख उपस्थितीत पचकावणीचा सोहळा पार पडला.

समाजबांधवांकडून कौतुक
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.प्रशांत जैन उपस्थित होते. यावेळी किशोर जैन, मोतिलाल जैन , उदयचंद जैन, अजय जैन, राजेंद्र जैन, किरण जैन, दिपक जैन, मनोज जैन, सुरेश कवाड, जगदीश जैन, अतुल जैन, जितेंद्र जैन, दगडू जैन, स्वतण जैन, स्वर्णिम जैन, संदेश जैन, योगेश जैन, प्रेमचंद जैन, चंपालाल जैन, निलेश जैन, अमरचंद जैन, मनोहर जैन, नंदलाल जैन, मनोज जैन, ललित जैन, महेंद्र जैन, राजेंद्र जैन आदींची उपस्थिती होती. रुपेश जैन व पंडित मनोज जैन यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाला खामगाव, अकोला, मोताळा, नांदुरा, धुळे, चोपडा, साकळी, नाशिक , उल्हासनगर आदी ठिकाणाहून समाजबांधवांची उपस्थिती होती.