12,000 seized sand stock from Bhusawal taluka was extended by thieves भुसावळ : अवैधरीत्या वाळू वाहतूक करून वाळूसाठा जप्त केल्यानंतर चोरट्यांनी 12 हजारांचा वाळूसाठ्यावर डल्ला मारला. या प्रकरणी भुसावळ तालुका पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
वाळू साठा लांबवल्याने खळबळ
तलाठी जयश्री सुधीर पाटील (भुसावळ) यांच्या तक्रारीनुसार बेलव्हाय येथील गट क्रमांक 117 मधील शोभाबाई सुकदेव नेहते यांच्या पडीत शेतात 20 ब्रास अवैध वाळू वाहतूक केलेला वाळू साठा जप्त करण्यात आला होता मात्र चोरट्यांनी 31 मार्च ते 13 मे दरम्यान चोरट्यांनी वाळू लांबवली. तपास पोलिस नाईक गणेश गव्हाळे करीत आहेत.