12 एक्स्प्रेससह 28 पॅसेंजर गाड्या रद्दने हाल

0

चार गाड्या शार्ट टर्मिनेट ; नऊ रेल्वे गाड्यांचे रेल्वे प्रशासनाने बदलले मार्ग ; ऐन गर्दीच्या हंगामातील रेल्वेच्या निर्णयामुळे रेल्वे प्रवासी संतप्त ; भुसावळ-भादलीदरम्यान तिसर्‍या लाईनसह नॉन इंटर लॉकिंगचे काम ; भुसावळात प्लॅटफार्म क्रमांक 9 व 10 चे काम अंतिम टप्प्यात

भुसावळ- तब्बल दिड महिन्यांपासून पॅसेंजर गाड्या रद्द असतानाच रेल्वे प्रशासनाने पुन्हा 4 रोजी तब्बल 12 एक्स्प्रेस गाड्यांसह 28 पॅसेंजर गाड्या पुढील 15 दिवस रद्दचा निर्णय घेतल्याने रेल्वे प्रवासी संतप्त झाले आहेत. शिवाय चार गाड्या शॉर्ट टर्मिनेट करण्यात आल्या असून नऊ एक्स्प्रेस गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. उन्हाळी सुट्यांमुळे रेल्वे गाड्यांना तोबा गर्दी असतानाच रेल्वे प्रशासनाकडून भुसावळ-भादली दरम्यान तिसर्‍या रेल्वे लाईनसह भुसावळ यार्डात रीमोल्डींग तसेच प्लॅटफार्म क्रमांक 9 व 10 च्या कामाला वेग देण्यात आला आहे. ही कामे पूर्ण झाल्याने रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

28 पॅसेंजर गाड्या रद्द
59013 सुरत-भुसावळ पॅसेंजर 5 ते 18, 59014 भुसावळ-सुरत पॅसेंजर 6 ते 19, 59077 सुरत ते भुसावळ पॅसेंजर 5 ते 18, 59018 भुसावळ-सुरत पॅसेंजर ही 6 ते 19 एप्रिलपर्यंत, 59075 सुरत-भुसावळ 6 ते 19 एप्रिलपर्यंत, 59076 भुसावळ-सुरत पॅसेंजर 6 ते 19 एप्रिलपर्यंत, 51153 मुंबई-भुसावळ पॅसेंजर 6 ते 20 एप्रिलपर्यंत, 51154 भुसावळ-मुंबई पॅसेंजर 5 ते 19 एप्रिलपर्यंत, 51182 भुसावळ-देवळाली पॅसेंजर 5 ते 19 एप्रिलपर्यंत, 51181 देवळाली-भुसावळ पॅसेंजर 6 ते 20 एप्रिलपर्यंत, 51157 भुसावळ-इटारसी पॅसेंजर 4 ते 19 एप्रिलपर्यंत, 51158 इटारसी-भुसावळ पॅसेंजर 7 ते 22 एप्रिलपर्यंत, 51187 भुसावळ-कटनी पॅसेंजर 5 ते 19 एप्रिलपर्यंत, 51188 कटनी-भुसावळ पॅसेंजर 7 ते 21 एप्रिलपर्यंत, 51285 भुसावळ-नागपूर पॅसेंजर 6 ते 19 एप्रिलपर्यंत, 51286 नागपूर-भुसावळ पॅसेंजर 6 ते 19 एप्रिलपर्यंत, 51197 भुसावळ-वर्धा पॅसेंजर 6 ते 19 एप्रिलपर्यंत, 51198 वर्धा-भुसावळ पॅसेंजर 7 ते 20 एप्रिलपर्यंत, 51183 भुसावळ-नरखेड पॅसेंजर 7 ते 19 एप्रिलपर्यंत, 51184 भुसावळ-नरखेड पॅसेंजर 6 ते 20 एप्रिलपर्यंत, 51151 नरखेड पॅसेंजर 5 ते 19 एप्रिलपर्यंत, 51152 नरखेड पॅसेंजर 6 ते 20 एप्रिलपर्यंत, 51189 इटारसी पॅसेंजर 5 ते 20 एप्रिलपर्यंत, 51190 इटारसी पॅसेंजर 6 ते 21 एप्रिलपर्यंत, 51679 कटनी पॅसेंजर 6 ते 20 एप्रिलपर्यंत, 51680 कटनी पॅसेंजर 6 ते 20 एप्रिलपर्यंत, 51195 वर्धा-बल्लारशाह पॅसेंजर 7 ते 20 व 51196 बल्लारशाह-वर्धा पॅसेंजर 7 ते 20 दरम्यान रद्द करण्यात आली आहेत.

चार गाड्या शॉर्ट टर्मिनेट
12405 भुसावळ-निजामुद्दीन गोंडवाना एक्स्प्रेस 7 ते 16 दरम्यान तसेच 12406 निजामुद्दीन-भुसावळ गोंडवाना एक्सप्रेस 5 ते 14 दरम्यान नागपूरहून सुटेल तसेच 11025 भुसावळ-पुणे हुतात्मा एक्स्प्रेस ही 6 ते 20 दरम्यान नाशिक रोड स्थानकावरून सुटेल तर 11026 पुणे-भुसावळ हुतात्मा 5 ते 19 दरम्यान नाशिक रोड स्थानकावरून सुटणार आहे.

12 एक्स्प्रेस गाड्या रद्द
19025 सुरत-अमरावती एक्स्प्रेस 5 ते 19 एप्रिलदरम्यान रद्द करण्यात आली असून 19026 अमरावती-सुरत 6 ते 20 दरम्यान, 22111 भुसावळ-नागपूर एक्स्प्रेस 5 ते 19 दरम्यान, 22112 नागपूर-भुसावळ एक्स्प्रेस 6 ते 20 दरम्यान, 22124 अजनी-पुणे एक्स्प्रेस 16 रोजी रद्द करण्यात आली आहे. 22123 पुणे-अजनी ही 19 रोजी रद्द करण्यात आली असून 22117 पुणे-अमरावती एक्स्प्रेस 17 रोजी रद्द करण्यात आली. 22118 अमरावती-पुणे 18 रोजी रद्द असून 11417 नागपूर एक्स्प्रेस 18 रोजी रद्द असून 11418 नागपूर एक्सप्रेसदेखील 19 रोजी रद्द करण्यात आली आहे. 01664 हबीबगंज साप्ताहिक एक्स्प्रेस 19 तसेच 01663 धारवड-हबीबगंज एक्स्प्रेस 20 रोजी रद्द करण्यात आली आहे.

नऊ गाड्यांचे मार्ग बदलले
19046 ताप्ती गंगा एक्स्प्रेस 5 ते 19 दरम्यान कटनी-बिना-रतलाम-भोईसरमार्गे धावणार आहे. 19045 सुरत-छपरा ताप्ती एक्सप्रेस भोईसरमार्गे धावेल. 15068 गोरखपूर एक्स्प्रेस 19 रोजी भोईसर, रतलाम-बीना मार्गे धावेल तर 15067 गोरखपूर एक्स्प्रेस 17 रोजी याच मार्गाने परतीच्या प्रवासात धावेल. 22947 सुरत-भागलपूर 6 ते 16 दरम्यान भोईसर-रतलाम-बीना-कटनी मार्गे धावेल तर 22948 भागलपूर-सुरत एक्स्प्रेस परतीच्या प्रवासात याच मार्गाने 8 ते 18 दरम्यान धावणार आहे. 18501 विशाखापट्टम-गांधीधाम एक्स्प्रेस 18 रोजी अकोला-खंडवा,-इटारसी-भोपाळ-भोईसरमार्गे धावेल 12843 पुरी-अहमदाबाद एक्स्प्रेस 18 रोजी अकोला-खंडवा-इटारसी-भोपाळ-भोईसर मार्गे धावणार तर 18844 अहमदाबाद-पुणे एक्स्प्रेस 18 रोजी बदल केलेल्या मार्गाने धावणार आहे.

सोशल मिडीयावर माहिती व्हायरल
सर्वसामान्य रेल्वे प्रवाशांसाठी नेमक्या कुठल्या गाड्या सुरू ठेवण्यात आल्या असून कुठल्या रद्द झाल्या याची माहिती प्रसिद्धी माध्यमांना रात्री उशिरापर्यंत देण्यास रेल्वे प्रशासनाने दिरंगाई केली मात्र दुसरीकडे सोशल मिडीयावर मात्र 5 एप्रिलपासून कोणत्या गाड्या रद्द झाल्या याची पोस्ट व्हायरल झाल्याने आश्‍चर्य व्यक्त करण्यात आले. रेल्वे प्रशासनाच्या अजब निर्णयामुळे आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे.