12 वर्षांच्या मुलाने बनवले एक अनोखे जहाज

0

समुद्रातील प्रदूषण व समुद्री जीवही वाचविण्यासाठी होणार उपयोग

पुणे : केवळ 12 वर्षीय हाकिझ काझी या मुलाने एक अनोखे जहाज तयार केले असून त्याचे कौतुक जगभरात होत आहे. या जहाजेला त्याने ‘ईआरव्हीआयएस’ (एठतखड) असे नाव दिले आहे. या जहाजाद्वारे समुद्रातील प्रदूषण कमी करण्यास त्याचप्रमाणे समुद्री जीवही वाचविण्यास मदत होणार आहे.

या विषयावर अनेक माहितीपट बघितल्यावर कचर्‍याचा अनिष्ट परिणाम समुद्री जीवनावर होत असल्याचे हाकिझला समजले तेव्हा त्याने यावर काहीतरी करण्याचा निर्णय घेतला. यामुळे मानवी जीवनही प्रभावित होत आहे. यासाठीच ‘ईआरव्हीआयएस’ या जहाजाची रचना केल्याचे हाकिझने एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.

‘ईआरव्हीआयएस’च्या वैशिष्ट्याबद्दल हाकिझ म्हणाला, सेंट्रीपेटल टेक्नॉलॉजीचा वापर करून जहाज समुद्रातील कचर्‍याला ओढून घेईल. यानंतर ते पाणी, समुद्री जीव व कचर्‍याला वेगवेगळे करेल. समुद्री जीव व पाण्याला पुन्हा समुद्रात सोडण्यात येईल.

9 वर्षांचा असताना कल्पना सुचली

हाकिझने आपली कल्पना टेडएक्स (TedEx) आणि टेड8 (Ted8) च्या अंतर्गत अनेक आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरही मांडली आहे. व त्याचे सर्वच स्तरावरून कौतुक करण्यात आले आहे. काझीने दावा केला आहे ईआरव्हीआयएस जहाज समुद्रातील कचर्‍याला खेचून त्याच्या आकारानुसार विभाजनाचे काम करेल. तसेच जहाजाच्या खालच्या भागात सेन्सर असेल जे समुद्री जीव, पाणी आणि कचर्‍याला डिटेक्ट करेल. ही कल्पना काझीला 9 वर्षाचा असताना सुचली होती.