12 वा खेळाडू राहू नये असा नियम आहे का? रहाणेची संयत प्रतिक्रिया

0

नवी दिल्ली । कसोटी संघाचा उपकर्णधार आहे म्हणून मी एकदिवसीय सामन्यात 12 वा खेळाडू राहू नये, असा नियम नाही. जेव्हा तुम्ही देशाचे प्रतिनिधीत्व करता. तेव्हा तुमच्या अंगावर जी जबाबदारी येईल ती पार पाडावी लागते. चॅम्पियन्स ट्रॉफी दरम्यान मला मैदानात पाणी घेऊन जावे लागले. यात माझा अहंकार आडवा आला नाही, अशी संयत प्रतिक्रिया भारतीय संघाचा शैलीदार फलंदाज अजिंक्य रहाणे याने दिली आहे.

रहाणे सकारात्मक
मार्च महिन्यात कसोटी संघाचे कर्णधारपद भुषवल्यानंतर त्याच संघात 12 वा खेळाडू म्हणून त्याने भूमिका निभावली होती. यावरून प्रश्न उठत असताना त्याने सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे. धर्मशाला येथे झालेल्या ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या कसोटी सामन्यात विराट कोहलीच्या अनुपस्थितीत त्याने संघाचे नेतृत्व सांभाळले होते.

मी स्वतःला असुरक्षित समजत नाही सामन्यात भारताने विजय मिळवला होता. परंतु, जून महिन्यात झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये त्याला संघात स्थानच मिळाले नव्हते. यावेळी अजिंक्य म्हणाला की, सध्या भारतीय संघ चांगल्या टप्प्यातून जात आहे. अनेक चांगले खेळाडू संघात स्थान मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी स्पर्धा असणे चांगले असून मी कधीच आयुष्यात स्वत:ला असुरक्षित समजत नाही.