पुणे । राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने जुलै महिन्यात घेण्यात आलेल्या 12वीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल दुपारी एक वाजाता ऑनलाइन पद्धतीने निकाल जाहीर झाला असून राज्याचा एकूण निकाल 24.96 टक्के तर पुणे विभागाचा निकाल 25.89 टक्के निकाल लागला आहे.
या परीक्षेसाठी राज्यभरातून 94 हजार 336 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 93 हजार 271 विद्यार्थी परीक्षेस बसले होते. यातून 23 हजार 283 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकालाची टक्केवारी 24.96 इतकी आहे. एकूण 132 विषयांची ही परीक्षा घेण्यात आली होती. विद्यार्थ्यांना 24 ऑगस्टला त्यांच्या मूळ गुणपत्रिका देण्यात येणार आहेत. यासाठी 17 हजार 284 विद्यार्थी बसले होते त्यापैकी 4 हजार 474 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. औरंगाबाद विभागाचा निकाल सर्वाधिक 37 टक्के लागला आहे तर सर्वात कमी निकाल मुंबई विभागाचा लागला आहे. ज्यांना गुणपडताळणी करायची आहे त्यांनी 22 ते 31 ऑगस्ट दरम्यान विभागीय मंडळाकडे अर्ज करायचा आहे. उत्तरपत्रिकेच्या छायांकित प्रती हव्या आहेत त्यांनी 22 ऑगस्ट ते 11 सप्टेंबरपर्यंत अर्ज करायचा आहे.