पुणे । महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत बारावी फेरपरीक्षेचा ऑनलाइन निकाल सोमवारी (दि.21) जाहीर होईल. दि. 24 ऑगस्टला विद्यार्थ्यांना निकालाचे मूळ गुणपत्रक मिळणार आहे. बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर विषयनिहाय गुण उपलब्ध होतील व निकालाच्या प्रिंटआऊट घेता येईल, असे राज्य शिक्षण मंडळाचे सचिव कृष्णकुमार पाटील यांनी सांगितले. गुणाची पडताळणीसाठी 22 ते 31 ऑगस्ट या कालावधीत संबंधित विभागीय मंडळाकडे अर्ज करावेत.