सावदा : सावदा सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालय व विश्रामगृहाची वीज थकबाकी न भरल्याने महावितरण कंपनीने वीजपुरवठा कट केल्याने खळबळ उडाली आहे. कोट्यवधींची सार्वजनीक हिताची कामे करणार्या सार्वजनिक बांधकाम विभागातील सावदा कार्यालयाची वीज केवळ 12 हजार रुपयांची थकबाकी न भरल्याने वीज वितरण कंपनीतर्फे सोमवार, 23 पासून तोडण्यात आल्याने सार्वजनिक बांधकाम विभागावर टिकेची झोड उठली आहे.
वीजपुरवठा कट होण्याची नामुष्की
सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालय तसेच अनेक मोठे व्ही.आय.पी. तसेच मोठ्या सरकारी अधिकारी यांच्यासाठी राखीव असलेल्या विश्रामगृहाचा थकाबाकीपोटी गेल्या चार दिवसांपासून वीजपुरवठा कट झाल्याने आश्चर्य व संताप व्यक्त होत आहे. ऐनवेळी विश्रामगृहात कोणी व्ही.आय.पी. व्यक्ती आल्यास अश्यावेळी येथील लाईट नसल्याने मोठी पंचाईत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. केवळ 12 हजारांचे लाईटबिल भर ल्याने वीजपुरवठा खंडित करून घेण्याची नामुष्की सावदा सार्वजनिक बांधकाम विभागावर ओढवली आहे. याबाबत कनिष्ठ अभियंता यांनी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांनी वीज बिल भरण्यासाठी पैसे नव्हते, पैसे आल्यावर ते भरून लवकरच वीजपुरवठा सुरळीत करण्यात येईल, असे उत्तर दिले.