गृहकर्जाचे १२ मासिक हप्ते माफ होणार?

0

मुंबई – अॅक्सिस बँकेने आपल्या गृहकर्ज ग्राहकांसाठी एक धमाकेदार ऑफर जाहीर केली आहे. तुमचे गृहकर्ज ३० लाखांच्यावर असेल तर तुम्हाला १२ महिन्यांचे मासिक हफ्ते माफ होणार आहेत. हे कर्ज घर खरेदी, दुरुस्ती, बांधकाम किंवा जमीन घेऊन बांधकामासाठीच वापरता येऊ शकतं. या गृहकर्जाचा व्याजदर ८.३५ टक्के असेल.

अॅक्सिस बँकेने आणलेल्या शुभारंभ नव्या योजने अंतर्गत ही ऑफर दिली आहे. जर कर्जदाराने नियमित कर्ज भरलं, तर त्याला चौथ्या, आठव्या आणि बाराव्या वर्षी असे चार-चार महिने सूट दिली जाईल. तसेच जर तुमचं दुसऱ्या बँकेत गृहकर्ज असेल, तर ते अॅक्सिस बँकेत ट्रान्सफर करण्याची ऑफरही देण्यात आली आहे.