यूपीत विषारी दारूचे सेवन केल्याने 12 जणांचा मृत्यू !

0

बाराबंकी: उत्तर प्रदेशमधील बाराबांकी जिल्ह्यामध्ये विषारी दारूचे सेवन केल्याने 12 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष बाब म्हणजे यात एकाच कुटुंबातील चार जणांचा समावेश आहे. दारू प्यायल्यानंतर काही जणांना अस्वस्थ जाणवू लागल्याने त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.