बारावीचा निकाल ८८.४१ टक्के

0

पुणे : राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल ८८.४१ टक्के इतका लागला आहे. एकूण १४ लाख १६ हजार ९८६ विद्यार्थी परीक्षेला बसले होते, त्यापैकी १२ लाख ५२ हजार ८१७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

राज्यात कोकण विभागाचा निकाल ९४.८५ टक्के एवढा सर्वाधिक लागला आहे. नाशिक विभागाचा निकाल सर्वात कमी ८६.१३ टक्के लागला आहे. या निकालात देखील मुलींनी बाजी मारली असून उत्तीर्ण होणाऱ्या मुलींचे प्रमाण ९२.३६ टक्के आहे. तर, मुलांचे ८५.२३ एवढे टक्के आहे. विद्यार्थ्यांना त्यांचा वैयक्तिक निकाल १ वाजल्यापासून संकेतस्थळावर पाहता येणार आहे.