अमळनेर । येथील सरस्वती विद्या मंदिर शाळेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. त्यांच्या पुण्यतिथी निमित्त सरस्वती शाळेत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मुख्याध्यापक व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सावित्रीबाईं फुलेच्या जीवनपट विषयी माहिती दिली.
याप्रसंगी क्रांतीज्योती सावित्रीबाईंच्या प्रतिमेस मुख्याध्यापक रणजित शिंदे व शिक्षकवृंद यांनी पुष्पहार अर्पण केले. याप्रसंगी विद्यार्थिनींनी प्रतिमापूजन केले. शाळेचे उपशिक्षक आनंदा पाटील, संगीता पाटील, गितांजली पाटील, परशुराम गांगुर्डे, ऋषिकेश महाळपुरकर, धर्मा धनगर तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.