125 किलो तिळगूळ व हलव्याच्या दागिन्यांचा महानैवेद्य

0

पुणे । हलव्याचा नयनरम्य तन्मणी, हार, मुकुट… तिळगूळ, गूळ पोळी, तिळवडी, पापडी, गूळ मोदकाच्या तोरणांनी सजलेले दत्तमंदिर आणि सुबक असा नारळी हार घातल्यानंतर दिसणारी दत्तमहाराजांची विलोभनीय मूर्ती पाहण्याकरीता दत्तमंदिरामध्ये भाविकांनी गर्दी केली. मकरसंक्रांतीनिमित्त लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे दत्तमहाराजांना 125 किलो गूळ, तिळगूळ आणि हलव्याच्या दागिन्यांचा महानैवेद्य दाखविण्यात आला.

यावेळी अध्यक्ष अंकुश काकडे, अ‍ॅड. शिवराज कदम जहागिरदार, बी.एम.गायकवाड, शिरीष मोहिते, चंद्रशेखर हलवाई, अ‍ॅड. एन. डी.पाटील, युवराज गाडवे, उल्हास कदम, नंदकुमार सुतार उपस्थित होते. शशांक हापसे यांच्या पेढीने ही आरास करण्याकरीता गूळ देऊन सहकार्य केले. अ‍ॅड. जहागिरदार म्हणाले, मकरसंक्रातीनिमित्त 121 किलो गूळ, 5 किलो तीळ, 25 किलो हलवा, गूळ पोळी, तिळवडी, पापडी, मोदक, गुळाच्या ढेपी वापरून सुभाष सरपाले यांनी ही आरास केली.