राधिका आपटे करणार ऑर्गन डोनर

0

मुंबई: बरेच वेळा बॉलीवूडचे कलाकार आपल्याला समाजसेवा करताना दिसून येत असतात. मग ती कुठल्याही प्रकारची समाजसेवा असो ते आपापल्या परीने करीत असतात. अक्षय कुमार, सलमान खान, शाहरूख खान, सुश्मिता सेन, रविना टंडन, जुई चावला अशा काही सेलेब्स या यादीत समावेश आहे. या कलाकारांसोबत आता आणखीन एका कलाकाराने एन्ट्री केलीली आहे ती म्हणजे अभिनेत्री राधिका आपटे. अभिनेत्री राधिका आपटेने मराठी व हिंदी चित्रपटात विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. राधिकाने सोशल मीडियावर अवयवदान करणार असल्याचे एका विडिओ द्वारे सांगितले आहे.


राधिका समाजकार्यासाठी पुढे सरसावली आहे. तिने ‘ऑर्गन डोनेशन’ अर्थात अवयवदान करणार असल्याचे सांगितले आहे. राधिकाने आपल्या ऑफिशिअल ट्विटर अकाउंटवरुन याबाबत घोषणा केली आहे.