बारावीची गणिताची प्रश्नपत्रिका फुटली, सोशल मीडियावर व्हायरल
पुणे |प्रतिनिधी
बारावीच्या परीक्षेत शुक्रवारी गणिताच्या प्रश्नपत्रिकेची दोन पाने समाज माध्यमात पसरल्याचे निदर्शनास आले. परीक्षा सुरू होण्यापूर्वीच हा प्रकार झाल्याची माहिती असून, या प्रकाराची राज्य मंडळाकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे.
राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक म्हणाल्या की, गणिताच्या प्रश्नपत्रिकेची दोन पाने समाज माध्यमात फिरत असल्याचे निदर्शनास आले. सहायक परीरक्षकाकडून प्रश्नपत्रिका परीक्षा केंद्रावर पोहोचल्या. मात्र त्यानंतर या प्रश्नपत्रिकेची दोन पाने कशी समाज माध्यमात आली, किती विद्यार्थ्यांपर्यंत ही पाने पोहोचली याची चौकशी करण्यात येत आहे.