मुंबई । 13 सप्टेंबर रोजी सातव्या वेतन आयोगासाठी ठाम असणार्या एसटी महामंडळातील युनियनची मिटींग होते आहे. त्या मिटींगमध्ये दिवाळीपूर्वीची संपाची तारीख जाहीर होणार असल्याचे महाराष्ट्र एसटी वर्क्स काँग्रेस इंटकचे अध्यक्ष जयप्रकाश छाजेड यांनी सोमवारी मुंबईत झालेल्या इंटक राज्य कार्यकारिणीच्या मीटिंगमध्ये जाहीर केले. मान्यताप्राप्त एसटी कामगार संघटना ठरल्याप्रमाणे रितसर संपाची नोटीस देइल व आपण सर्वांनी एकत्र या संपात सहभागी व्हायचे आहे, असे आवाहन छाजेड यांनी केले आहे. एस.टी कर्मचार्यांची ही अंतिम लढाई असून आता माघार नाही. कर्मचार्यांनी आता या लढाईसाठी सज्ज रहावे, असे आवाहन छाजेड यांनी केले. संपूर्ण देशभरातल्या अनेक एसटी कर्मचार्यांना वेतन आयोग लागू आहे.
महामंडळाचे खासगीकरण
मग आपल्या महामंडळाला का नाही, असा सवाल छाजेड यांनी केला. परिवहन मंत्री महामंडळाचे खासगीकरण छुप्या पद्धतीने करत आहेत याच उत्तम उदाहरण म्हणजे खाजगी मालकी असलेल्या शिवशाहीच्या गाड्या महामंडळात भ्रष्टाचार तर शिगेला पोहोचलेला आहे. यावर ही आता आवाज उठवणयाची गरज निर्माण झाली आहे. एस.टी कर्मचार्यांनी कधीही प्रवाशांना त्रास होइल असे कृत्य केलेले नाही परंतु प्रवाशांनाही ही माहिती झालेले आहे एसटीतील कर्मचार्यांना खूप कमी पगार असल्याचे आपल्या या करेंगे या मरेंगे च्या संपात राज्य भरातील सर्व पीडित एसटी कर्मचार्यांनी सहभागी होण्याचे आवाहन छाजेड यांनी केल्याचे इंटकचे राज्य प्रसिद्धीप्रमुख रत्नपाल जाधव यांनी त्यांच्या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे.