13 जुलै रोजी राष्ट्रवादीचा मुक मोर्चा

0

जळगाव । कोपर्डी घटनेला 1 वर्ष पुर्ण झाले असून सरकारने दिलेल्या आश्‍वासनाप्रमाणे कृती झाले नसल्याच्या निषेधार्थ गुरूवार 13 जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर मुक मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष आमदार डॉ.सतीष पाटील पत्रकार परिषदेत दिली. याप्रसंगी अ‍ॅड.रविंद्र भैय्या पाटील, विलास पाटील, विकास पवार, मंगला पाटील, कल्पना पाटील, मिनल पाटील, राजेश पाटील, योगेश देसले, पठाण. भारूडे आदी पदाधिकारी उपस्थित होते. मोर्चा नंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा विविध आघाडीनिहाय मेळावा श्री कृष्ण लॉन येथे होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून जिल्हा व महानगर राष्ट्रवादी पक्षाच्या पदाधिकार्‍यांमध्ये असणारी उदासिनता यानिमित्ताने पुन्हा एकदा दूर होईल काय? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पक्ष संघटन वाढीसाठी वरिष्ठ पातळीवर कठोर निर्णय घेण्यासाठी आता मागे-पुढे पाहिले जाणार नाही अशी अपेक्षा कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत आहे.

राज्यातील पोषण आहाराचा ठेका एकालाच कसा?
उध्दव ठाकरेयांचा बुधवारी जिल्हा दौरा झाला. तेच तेच ते बोलत असल्याने जनता कंटाळली आहे. शिवसेना सरकारमध्ये असून विरोध करत आहे. जनतेला त्यांच्यावर विश्‍वास राहिलेला नाही. जर शेतकर्‍यांचा कळवळा होता तर लागलीच निर्णय घेवून सरकारला जमिनीवर आणायला हवे होते असे आ. पाटील यांनी स्पष्ट केले. 25 रोजी शिवसेना स्फोट करणार असे विधान ठाकरे यांनी पुर्वी केले होते. परंतु जिल्हा दौर्‍यांत ते याबद्दल काहीच बालले नाही. 24 पासून अधिवेशन सुरू होत आहे. 25 रोजी त्यांचा कोणता फटाका फुटतो ते पाहू. जिल्हा परिषदेतील शालेय पोषण आहाराचा ठेका संपूर्ण राज्यात एकाच ठेकेदाराला देण्यात आला आहे. याबाबत विधानसभेत लक्षवेधी उपस्थित करणार असल्याचे आ. पाटील यांनी सांगितले. पोषण आहाराचा हा घोटाळा केवळ जळगाव जिल्ह्यात नसून राज्यभर आहे. शेतकर्‍यांना 10 हजार रुपयांचे कर्ज घोषणा झाली.त्यासाठी 1200 कोटी रुपयांचे नियोजन केले परंतु सरकारने हे पैसेच उलले नसल्याची माहिती आ. पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. पक्ष संघटना मजबुत करण्यासाठी व सरकार कशा प्रकारे फसवणुक करत आहे हे दाखविण्यासाठी आ.अजित पवार व पदाधिकारी प्रत्येक जिल्ह्याचा दौरा करत आहे असे त्यांनी सांगीतले.

हे आहेत मुद्दे..
मोर्चांचे नेतृत्व माजी उपमुख्यमंत्री आ.अजित पवार करतील. मोर्चानंतर मेळाव्यास प्रदेशाध्यक्ष आ.सुनिल तटकरे, दिलीपवळसे पाटील, गायकवाड हे संघटना वाढीच्या दृष्टीने मार्गदर्शन करतील. मनपा अध्यक्ष व महिला अध्यक्ष यांनी राजीनामा दिला आहे. पक्षात जिल्ह्यात विविधपदे रिक्त असून ती भरली जाणार आहेत. कोपर्डी घटनेला 13 तारखेला एक वर्ष होत आहे. सरकराने दिलेले आश्‍वासन पाळले नाही. कर्ज मुक्तीची घोषणा फसवीअसून आज पर्यंत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला कर्जमुक्तीबाबत ठोस काही उपलब्ध झालेले नाही. दररोज नवीन जीआर काढण्यात येतात. शेतकर्‍यांच्या पदरात काहीही पडलेले नाही.