जळगाव । एस.एस. मणियार विधी महाविद्यालय आयोजित डॉ.अण्णासाहेब जी.डी. बेंडाळे स्मृती 13 व्या राष्ट्रीय अभिरुप न्यायालय स्पर्धेचे उद्घाटन मुंबई उच्च न्यायालयाचे न्या. एम.एस.कर्णिक यांच्या हस्ते झाले. न्या. कर्णिक यांनी वकीलांनी न्यायालयाची प्रतिष्ठा उंचावण्यासाठी मुल्यात्मक न्याय्य भूमिका पार पाडावी. भावी वकीलांसाठी खूप संधी उपलब्ध आहेत. त्यासाठी कठिण परिश्रम व शिस्तीची अवश्यकता असल्याचे नमूद केले. तसेच न्या. हंकारे यांनी देशहीताला सर्वोच्च प्राधान्य देण्रात वकीलांची भूमिका महत्वपूर्ण असल्याचे स्पष्ट केले. डॉ. माहुलीकर यांनी महाविद्यालयाचा विधी शिक्षणातील योगदान सांगून कौतूक केले.
गौरवशाली वारसा
अॅड.प्रकाश पाटील यांनी त्वरीत न्याय मिळवून देण्यासाठी भावी वकील विद्यार्थ्यांनी प्रयत्न करावे असे आवाहन करून राष्ट्रीय अभिरुप न्यायालयाचा गौरवशाली वारसा स्पष्ट करुन सहभागी स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या. कार्यकमाच्या सुरवातीला प्राचार्य डॉ.युवाकुमार रेड्डी यांनी आपल्या प्रास्ताविक केले. महाविद्यालयाच्या सुवर्णपदक प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यकमाचे सुत्रसंचलन ऋतुजा लाठी आणि मिताली वाणी यांनी केले. शेवटी प्रा.डी.आर.क्षीरसागर यांनी आभार मानले.
यांची लाभली उपस्थिती
जिल्हा व सत्र न्यायाधीश सी.आर.हंकारे प्र-कुलगुरू प्रा.डॉ.पी.पी. माहुलीकर, सचिव अॅड.एस.एस.फालक, अॅड.सुनिल चौधरी, प्राचार्य डॉ.बी.युवाकुमार रेड्डी, डॉ.विजेता सिंग, के.एच.ठोंबरे, प्रतिभा पाटील, अतूल आळसी, अॅड.आर.आर.महाजन, अॅड.प्रमोद पाटील, अॅड.आनंद मुजुमदार, अॅड.सत्यजित पाटील, अॅड.सौरभ मुंदडा, अॅड.अतुल सुर्यवंशी, अॅड.हेमंत भंगाळे, प्रा.डी.आर.क्षीरसागर, प्रा.रेखा पाहुजा, प्रा.जी.व्ही. धुमाळे, प्रा.योगेश महाजन, प्रा. अंजली बोंदर, प्रा. योती भोळे आदी उपस्थित होते.