130 कुपोषित बालकांच्या तपासणीसह औषधांचे वाटप

0

आमदार संजय सावकारे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रतिष्ठा महिला मंडळाचा उपक्रम

भुसावळ– समाजाचं आपण देणं लागतो या उदात्त भावनेतून शहरातील सामाजिक कार्यात आघाडीवर असलेल्या प्रतिष्ठा महिला मंडळातर्फे शहर व तालुक्यातील 130 कुपोषित बालकांची तपासणी करून त्यांना औषधांसह पोषण आहाराचे वाटप करण्यात आले. भुसावळचे आमदार संजय सावकारे यांच्या नुकत्याच झालेल्या वाढदिवसाचे औचित्य साधून शनिवारी पंचायत समिती सभागृहात हा उपक्रम राबवण्यात आला.

या मान्यवरांची कार्यक्रमास उपस्थिती
भुसावळ तालुक्यातील अति तीव्र कमी वजनाची तसेच कमी वजनाच्या सुमारे 130 वर बालकांची तपासणी बालरोग तज्ज्ञ डॉ.नीलिमा नेहते यांनी केली. प्रसंगी प्रतिष्ठा महिला मंडळामार्फत या बालकांना मोफत औषधांसह व पोषण आहाराचे वाटप करण्यात आले. अध्यक्षस्थानी आमदार संजय सावकारे होते तर प्रमुख अतिथी म्हणून लोकनियुक्त नगराध्यक्ष रमण भोळे, पंचायत समिती उपसभापती मनीषा पाटील, पंचायत समिती सदस्या वंदना उन्हाळे, भाजपा शहर महिलाध्यक्षा मीना लोणारी, प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी सावकारे, अर्चना सोनवणे, अनिता आंबेकर, भाजपा तालुका सरचिटणीस नारायण कोळी, रवींद्र पाटील, प्रकल्प अधिकारी एन.बी.कराळे, पर्यवेक्षक जयश्री जोशी, गायकवाड, पाटील तसेच तालुक्यातील अंगणवाडी सेविका व तीव्र कमी वजनाचे मुलांचे माता या कार्यक्रमास हजर होत्या.

वर्षभराच्या इच्छेची वाढदिवसानिमित्त पूर्ती
आमदाराच्या सुविद्य पत्नी रजनी सावकारे या इनरव्हील क्लब अध्यक्षा असताना 2016 मध्ये पिंपळगाव आरोग्य उपकेंद्रांतर्गत 25 मुलांची आरोग्य तपासणीचा कार्यक्रम घेण्यात आला होता. त्यावेळी सावकारे यांनी तालुक्यातही अशाच पद्धत्तीने उपक्रम राबवण्याची इच्छा व्यक्त केली होती तर प्रत्यक्षात आमदार सावकारे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शनिवारी इच्छेची पूर्तीदेखील झाल्याने रजनी सावकारे यांच्यासह प्रतिष्ठा महिला मंडळाचे समाजमनातून कौतूक होत आहे.