नवी दिल्ली । पुढील महिन्यापासून आयपीएल सुरू होत आहे. आयपीएल म्हणजे क्रिकेटप्रेमींसाठी एक मनोरंजनाचा खजिनाच. आयपीएलमध्ये प्रत्येक खेळाडूने धडाकेबाज फलंदाजी करावी अशी अपेक्षा क्रिकेटप्रेमींची असते. काही खेळाडूंनी आपली ओळखच सिक्सर किंगच्या रूपात केली आहे. यामध्ये ख्रिस गेल, एबी डिविलियर्स, युवराज सिंग यांच्या नावाचा समावेश आहे. मात्र, क्रिकेटविश्वात असेही काही बॅट्समन आहेत ज्यांनी आपल्या पूर्ण एकदिवसीय क्रिकेटच्या कारकिर्दीमध्ये एकही षटकार लगावलेला नाही आहे. असेही काही फलंदाज आहेत ज्यांचे नाव सलामीला येणार्या फलंदाजांमध्ये अव्वल आहे आणि त्यांनी धावाही चांगल्या केल्या आहेत. मात्र, षटकार मारण्याच्या बाबतीत मागे आहेत. भारताच्या माजी सलामीचा फलंदाज वेगवान गोलंदाज मनोज प्रभाकरला 130 एकदिवसीय सामने खेळूनही एकदाही
षटकार ठोकता आलेला नाही.
मनोज प्रभाकर अष्टलपैलु क्रिकेटपटु होते. त्यांनी 1984 ते 1996 या दरम्यान क्रिकेट खेळले. प्रभाकर यांनी आपल्या एकदिवसीय क्रिकेट कारकिर्दीमध्ये 130 सामने खेळलेत आणि े यामध्ये 2 शतके आणि 11 अर्धशतकांसह 1858 धावा केल्या आहेत. फलंदाजीमध्ये चांगली कामगिरी करत असतानाही प्रभाकर यांनी एकही षटकार लगावला नाही. कसोटी क्रिकेटबाबत बोलायचें झाले तर त्यांनी 39 कसोटी सामन्यांमध्ये 33 च्या सरासरीने 1600 धावा केल्या आहेत. त्यात एक शतक आणि 11 अर्धशतकांचा समावेश आहे. कसोटी क्रिकेटमध्ये त्यांनी 4 षटकार लगावले आहेत.