कामगारांच्या मुलांसाठी शिष्यवृत्ती

0

मुंबई । महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या विभागीय कार्यालयाने कामगार कुटुंबिय गुणवंत पाल्यांचा सत्कार समारंभ शुक्रवारी (दि. 17 मार्च) सायंकाळी 5 वा. ललति कलाभवन नायगांव, गोविंदजी केणी मार्ग या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुंबई नागरीक को. ऑप. सो. लि. लालबागचे सेक्रेटरी आशिष भालेराव तर विशेष उपस्थिती म्हणून महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे कल्याण आयुक्त सतीश दाभाडे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. तसेच रायगडचे कामगार उपायुक्त अ. द. काकतकर, मार्स इंटरप्राप्राईजेस अँड हॉस्पिटिलिटी प्रा. लि. सांताक्रूझचे जनरल मॅनेजर संतोष काजरेकर, माझगाव डॉकचे कामगार कल्याण अधिकारी सतीश आंदेगावकर, आदिनाथ डेव्हलपर्स, लालबागचे पार्टनर शांताराम तुपे आदी मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती मुंबई विभाग सहाय्यक कल्याण आयुक्त नंदलाल राठोड यांनी केले आहे.

मुंबई विभागात शालांत परिक्षेत व उच्च माध्यमिक परिक्षेत 90 टक्केहून अधिक गुणांनी उत्तीण झालेल्या 15 कामगार कुटुंबिय यांना गौरविण्यात येणार आहे. तर विदेशात उच्च शिक्षण घेत असलेल्या 23 कामगार कुटुंबिय पाल्यांना प्रत्येकी 50 हजार रुपयांप्रमाणे एकूण 11 लाख 50 हजार रुपये रक्केमची परदेशी उच्च शिक्षण शिष्यवृत्ती प्रदान केली जाणार आहे.

राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत नैपुण्य मिळविलेल्या 7, राष्ट्रीय स्तरावरील 3 आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केलेल्या 5 कामगार पाल्य खेळाडूंना एकूण 1 लाख 17 हजार एवढ्या रक्कमेची क्रीडा शिष्यवृत्तीही यावेळी दिली जाणार असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली.