14 जण व्हेंटिलेटरवर

0

पुणे । स्वाइन फ्लूचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. मंगळवारी 11 रुग्णांची परिस्थिती अतिशय गंभीर होती. बुधवारी व्हेंटिलेटरवरील रुग्णांची संख्या 14 वर पोहचली आहे. स्वाइन फ्लूचा वाढता फैलाव लक्षात घेता शहरात चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे.

उपचारासाठी शहरात आलेल्या स्वाइन फ्लू बाधीत रुग्णांची संख्या जास्त असून मृत पावलेल्या 80 रुग्णांपैकी 56 रुग्ण हे पुण्याबाहेरील आहेत. बुधवारी तब्बल 3 हजार 117 नागरीकांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 149 संशयीत रुग्णांना टॅमी फ्लूचे औषध देण्यात आले, तर 18 रुग्णांचे घशातील स्त्रावाचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्यापैकी 4 रुग्ण हे स्वाइन फ्लू बाधीत आढळले असून सध्या 25 रुग्णांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.