यावल- तब्बल 19 लाख 25 हजारांच्या अपहार केल्याप्रकरणी किनगाव सरपंच सरपंचा ज्योती अशोक महाजन यांना बुधवारी यावल पोलिसांनी किनगावहून अटक केल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे तर या गुन्ह्यातील संशयीत आरोपी तथा तत्कालीन ग्रामविकास अधिकारी भास्कर चंद्रभान रोकडे हे पसार असून पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत. 14 व्या वित्त आयोगाचा निधी लोकप्रतिनिधींना भोवल्याची यावल तालुक्याच्या राजकीय गोटात चर्चा आहे.