14 एप्रिल 2022 पर्यंत आंबेडकर स्मारकाचे काम पूर्ण होईल: उपमुख्यमंत्री अजित पवार !

0

मुंबई: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज गुरुवारी इंदू मिलच्या जागेची पाहणी केली. यावेळी त्यांनी आंबेडकर स्मारकाच्या कामाची माहिती घेतली. आंबेडकर स्मारकाचे काम पूर्ण होण्यासाठी किमान दोनवर्ष तरी लागतील. 14 एप्रिल 2022 पर्यंत आंबेडकर स्मारकाचे पूर्ण होऊल असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

स्मारकासाठीची आवश्यक सर्व परवानगी देण्यात येऊन याच महिन्यात कामाला सुरुवात होईल. स्मारकाच्या कामाला कोणतीही अडचण येणार नसून लागेल तेवढा निधी हे सरकार आंबेडकर स्मारकासाठी उपलब्ध करून देईल असे अजित पवारांनी सांगितले.