14 दिवसानंतर उघडले ग्रामपंचायतचे कुलुप

0

नगरदेवळा। येथील ग्रामपंचायतीमध्ये 14 व्या वित्त आयोगाच्या निधीमध्ये झालेल्या गैरव्यवहारासंबंधी चौकशी करण्याची वेळोवेळी मागणी करुन देखील चौकशी होत नसून ग्रामपंचायत सदस्यांना हिशोब मिळत नाही. मागणी मान्य होत नसल्याच्या निषेधार्थ ग्रामपंचायतच्या 17 पैकी 14 सदस्यांनी ग्रामपंचायतला कुलुप ठोकले होते. बुधवारी 14 रोजी कुलुप उघडण्यात आले आहे. ग्रामसेवक व सदस्यांच्या उपस्थितीत कुलुप उघडण्यात आले. गटविकास अधिकारी गणेश चौधरी यांनी अहवाल वरिष्ठांकडे पाठविला असून सीईओंकडे तक्रार करणार असल्याचे आश्‍वासन दिल्यानंतर ग्रामपंचायतचे कुलुप उघडण्यात आले. सदस्यांनी ग्रामविकास अधिकारी व विस्तार अधिकारी यांना निवेदन दिले होते.

आश्‍वासनानंतर उघडले कुलुप
वावरंवार निवेदनाद्वारे तसेच अर्जाद्वारी माहिती मागविण्यात आली मात्र दखल न घेतल्याने सदस्यांनी अग्नावती चौपाटीवर उपोषण करुन देखील कार्यवाही केली गेली नसल्याने ग्रामपंचायतला कुलुप ठोकण्याचा निर्णय घेतला. सदस्यांनी मागितलेली माहिती ग्रामसेवकांनी दिले मात्र ती माहिती सदस्यांना मान्य नव्हती. गटविकास अधिकारी गणेश चौधरी यांनी अहवाल वरिष्ठांकडे पाठविला असून सीईओंकडे तक्रार करणार असल्याचे आश्‍वासन दिल्यानंतर ग्रामपंचायतचे कुलुप उघडण्यात आले. या प्रसंगी सरपंच सुनंदा पाटील, ग्रामविकास अधिकारी ए.एस.राठोड, गटविकास अधिकारी गणेश चौधरी, कृष्णा सोनार, छाया परदेशी, शामराम बानोआरा, उषाबाई महाजन, दामु गढरी, सागर पाटील, नुर बेग, विनोद राऊळ, शरीफ खाटिक, प्रदीप परदेशी, संजय कुंभार, सुधाकर महाजन, आदींसह ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.