14 पासून इंडिपेंडन्स कप फुटबॉल स्पर्धा

0

मुंबई । मुंबई जिल्हा फुटबॉल संघटनेतर्फे स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून दोन दिवसीय इंडिपेंडन्स कप फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. 14 आणि 15 ऑगस्ट रोजी खेळण्यात येणार्‍या या स्पर्धेत एलिट आणि सुपर डिव्हिजन गटातील अव्वल 16 संघाना प्रवेश देण्यात आला असून स्पर्धेतील सामने नाईन अ साईड पद्धतीने खेळवण्यात येतील.

एलिट गटातील एअर इंडिया, मुंबई कस्टम्स, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, युनियन बँक ऑफ इंडिया, पश्‍चिम रेल्वे, कर्नाटक स्पोर्ट्स असोसिएशन, केंकरे फुटबॉल क्लब,
मुंबई स्ट्रायकर्स, सेंच्युरी रेयॉन, गतविजेते भारतीय नौदलाच्या संघासह सेलेब्रिटी फुटबॉल क्लब, मुंबई मुस्लिम्स, एचडीएफसी बँक, देना बँक, यंग गन्स, मिल्लत फुटबॉल क्लब हे सुपर डिव्हीजन लीगमधील संघाची स्पर्धेच्या विजेतेपदासाठी दावेदारी असेल.