14 लाखांची फसवणूक

0

पुणे । लग्न करण्याच्या आमिषाने पुण्यातील युवतीची 14 लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी एका महिलेने समर्थ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. हा संपूर्ण प्रकार 12 ते 30 जून 2017 दरम्यान घडला.

तक्रारदार महिलेच्या मुलीच्या व्हॉट्सअपवर संपर्क साधून अज्ञात इसमाने ओळख वाढविली आणि तिला लग्न करण्याचे आमिष दाखवले. त्याने अमेरिकेत राहत असून लवकरच भारतात येणार असलचे तरुणीला सांगितले. एकेदिवशी दिल्ली विमानतळावर आल्याचे सांगत तिच्याकडे 14 लाख 25 हजार रुपयांची मागणी केली. पैसे बँक खात्यावर जमा करण्यास भाग पाडून तिची फसवणूक केली. याप्रकरणी गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक एस. एस. चव्हाण अधिक तपास करीत आहेत.