भुसावळ । शहरातील नाहाटा महाविद्यालयाच्या मैदानावर रविवार, 13 रोजी सकाळी 11 वाजता 14 वर्षाखालील मुला-मुलींची जळगाव जिल्हा संघासाठी टेनिस बॉल क्रिकेट निवड चाचणी होईल. निवडलेला संघ 19 ते 21 रोजी दरम्यान नंदुरबार येथे होणार्या राज्य अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धेत भाग घेणार आहे.
1 जानेवारी 2004 नंतर जन्मलेल्या खेळाडुंनी क्रिकेटची बॅट व गणवेशात वयाच्या छायांकित दाखल्यासह मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा संघटनेचे अध्यक्ष प्रा.चंद्रकांत सोनवणे, संघटनेचे उपाध्यक्ष शकील पटेल, सामाजिक कार्यकर्ते प्रमोद सावकारे, प्राचार्या मीनाक्षी वायकोळे, शिक्षक राजू कुलकर्णी, ज्ञानेश्वर वाणी, गोपाळ जोनवाल, बी.एन.पाटील यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा सचिव वासेफ पटेल यांच्याशी संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे.