पाचोरा। तब्बल 14 वर्षापासुन मराठी शाळेवरती सिंधी हायस्कूलने कब्जा केला होता. या मनमानी कारभाराविरूध्द आणि गरीब विद्यार्थींच्या होणार्या त्रासाविरूध्द पाचोरा शिवसेनेने बंड पुकारला आणि जि.प.शाळेतील विद्यार्थींना न्याय मिळावा या आशेयाचे निवेदन उपोषण मुदतीसह गटविकास अधिकारी गणेश चौधरी यांना दिले होते. त्यासाठी सोमवारी 17 जुलै 2017 पासुन आमरण उपोषणाला शिवसेना शहरप्रमुख किशोर बारवकर बसणार होते. पण संबंधित शैक्षणिक विभागाने व बिडीओ गणेश चौधरी, श्री. महाजन, समाधान पाटील यांनी दखल देऊन संबंधित शाळेत घटनास्थळी भेट दिली.
शाळेच्या चाव्या प्राथमिक शाळेचे नाना भालेराव व मुख्याध्यापक यांना किशोर बारवकर यांच्या उपस्थितीत दिल्या आणि शाळा सुरू करून वर्गात विद्यार्थ्यांना बसवुन त्यांचा 14 वर्षांपासुनचा वनवास थांबवुन त्यांचा हक्क आणि न्याय मिळवुन दिला. सर्व विद्यार्थ्यांनी आनंद साजरा केला. यावेळी नगरसेवक सतिष चेडे, बापु हटकर, राम केसवाणी, जितेंद्र पेंढारकर, अजय जयस्वाल, नाना भालेराव, लक्ष्मण शिंदे, अॅड.कालीदास गिरी, जि.प शाळेचा शिक्षक व कर्मचारी वृद व शिवसेना आणि युवासेनाचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.