14 वर्षीय अल्पवयीन बालिकेवर अत्याचार : दोघांविरोधात गुन्हा

Rape Of Minor Girl : Crime Against two in Rawer Taluka रावेर : तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध निंभोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नितीन मधुकर पाटील व रमाबाई अमोल अवसरमल (रावेर तालुका) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयीतांची नावे आहेत.

अल्पवयीन मुलीवर अत्याचार
शनिवार, 17 सप्टेंबर रोजी 14 वर्षीय पीडीत अल्पवयीन मुलगी सरपणासाठी काड्या तोडत असतांना संशयीत आरोपी नितीन मधुकर पाटील हा दुचाकीवर आल्यानंतर त्याने अल्पवयीन मुलीवर बळजबरी करीत तिच्यावर त्याच्याच पेरूच्या मळ्यात अत्याचार केला तसेच या प्रकाराला संशयीत आरोपी महिलेने प्रोत्साहन दिले. या प्रकरणी निंभोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास उपविगायीय पोलीस अधिकारी डॉ.कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.