जळगाव : तालुक्यातील एका गावातील 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आला व त्यातून ती गर्भवती झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
14 वर्षीय बालिकेवर अत्याचार
जळगाव तालुक्यातील एका गावात राहाारी 14 वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या नातेवाईकांसह वास्तव्याला आहे. 15 नोव्हेंबर ते 10 नोव्हेंबर 2021 दरम्यान संशयीत आरोपी एजाज खान जहीर खान (गुजरात) याने मुलीशी जवळीक साधून दोन वेळा अत्याचार केला. या अत्याचारातून पीडीता गर्भवती राहिली. मंगळवार, 22 फेब्रुवारी रोजी सकाळी पीडीत मुलीच्या पोटात दुखायला लागले तेव्हा तिच्या पालकांनी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी आणले असता हा धक्कादायक प्रकार समोर आला. पीडीत मुलीला नातेवाईकांनी विश्वासात घेवून विचारपूस केली असता आपल्यावर संशयीत आरोपी एजाज खान जहीर खान (गुजरात) याने दोन वेळा अत्याचार केल्याचे सांगितले. पीडीत मुलीच्या नातेईकांना पिडीतेसह एमआयडीसी पोलिस ठाण्यात धाव घेवून रात्री 9 वाजता तक्रार दाखल केल्यानंतर आरोपीविरोधात पोक्सो कायद्यांर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक रवींद्र गिरासे करीत आहे.