मुंबई । भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या रांचीतील तिसरी कसोटी ही सर्वात जास्त लक्षवेधी ठरला आहे.या सामन्यात अनेक गोष्टी भारतीय प्रेक्षकांच्या लक्षात राहिल. जरी हा सामना अनिर्णीत राहिला असला तरी भारतीय फलंदाज व गोलंदाज यांच्यामुळे गाजला. रांचीत ऑस्ट्रेलियाविरोधात अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा याने 9 गडी बाद केले.आयसीसी कसोटी गुणतालिकेत पहिल्या स्थानावर गेला आहे.जडेजाने सात गुण मिळवित पहिल्या स्थानावर झेप घेतली आहे. रविद्र जडेजाने अश्विनला मागे टाकले आहे. आयसीसी टेस्ट रँकिंमगध्ये श्रीलंकेचा रंगना हेराथ तिस-या स्थानावर आहे. त्यानंतर अमुक्रमे ऑस्ट्रेलियाचा जॉश हेजलवुड आणि इंग्लंडचा जेम्स एंडरसन आहेत. तिसर्या कसोटी आधी भारतीय फिरकीपटू आर.अश्विन व रविद्र जडेजा याच्या नावे 892 अंक होते. रांची कसोटीत रवींद्र जडेजाने आपल्या फिरकीच्या प्रदर्शनाने सर्वांना प्रभावित केले. रांची कसोटीत पहिल्या सत्रात जाडेजाने पाच विकेट्स घेतले तर दुस-या सत्रात चार विकेट्स घेवून आपल्या फिरकीची जादू दाखवून दिली. तिस-या कसोटी सामन्यात नऊ विकेट्स घेवून एकूण 21 विकेट्स घेत जडेजा मालिकेतही आघाडीवर आहे. पहिल्या सत्रात पाच आणि दुस-या सत्रात चार विकेट्स घेत जडेजाने एकूण सात अंक कमावले आहेत. भारतीय गोलंदाज बिशन बेदी आणि आर अश्विन यांच्यानंतर अव्वलस्थान पटकवण्याचा पराक्रम करणारा जडेजा तिसरा गोलंदाज आहे. जडेजाकडे सध्या 899 अंक असून आर अश्विनच्या 900 अंकांच्या रेकॉर्डची बरोबरी करण्यापासून फक्त एक अंक दूर आहे. आऱ अश्विनकडे एकूण 904 अंक होते, मात्र रांचीत फक्त दोन विकेट्स मिळाल्याने 37 अंकाची घसरण झाली होती.
शर्मा धोकादायक भासत होता
भारतातर्फे पुन्हा एकदा रवींद्र जडेजाने अचूक मारा करताना 54 धावांच्या मोबदल्यात 4 बळी घेतले. दुसर्या बाजूचा विचार करता ऑस्ट्रेलियातर्फे हँड्सकोंब 200 चेंडू खेळून नाबाद राहिला.उपाहारापूर्वी भारताचा वेगवान गोलंदाज ईशांत शर्मा धोकादायक भासत होता; पण ऑस्ट्रेलियाने अखेरच्या दोन सत्रांत संयमी खेळी करून सामना अनिर्णीत राखला. मालिका आता 1-1 ने बरोबरीत असून 25 मार्चपासून धरमशाला येथे चौथा व अखेरचा कसोटी सामना खेळला जाईल.
चेतेश्वर भारताची अभेद्य भिंत
दुसरीकडे फलंदाजांच्या बाबतीत भारताचा दिवार म्हणून आपली ओळख निर्माण करत असलेला चेतेश्वर पुजारा याने आयसीसीच्या कसोटी फलंदाजांच्या क्रमारीत थेट दुसऱया स्थानावर झेप घेतली आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ 941 गुणांसह अव्वल स्थानावर आहे.
पुजाराने 861 गुण मिळवत दुसरे स्थान गाठले आहे. पुजाराने इंग्लंडचा जो रुट (848) आणि भारताचा कर्णधार विराट कोहली (826) यांना मागे टाकले आहे. पुजाराने रांची कसोटीत महत्त्वाच्या क्षणी मैदानात टीच्चून फलंदाजी करत 202 धावांची खेळी साकारली होती. पुजाराच्या द्विशतकामुळे भारतीय संघाला पहिल्या डावात ऑस्ट्रेलियावर समाधानकारक आघाडी घेता आली. भारताने पहिला डाव 9 बाद 603 धावसंख्येवर घोषित केल्यानंतर रविवारी दिवसअखेर ऑस्ट्रेलियाची दुसर्या डावात 2 बाद 23 अशी अवस्था झाली होती.
खेळताना ऑस्ट्रेलियाने दुसर्या डावात 6 बाद 204 धावांची मजल मारली असता, उभय कर्णधारांनी सामना अनिर्णीत संपल्याचे मान्य केले. ऑस्ट्रेलियातर्फे पीटर हँड्सकोंब व शॉन मार्श यांनी निर्णायक भूमिका बजावली.
हँड्सकोंब 72 धावा काढून नाबाद राहिला, तर मार्शने 53 धावांची खेळी केली.
या दोघांनी पाचव्या विकेटसाठी 124 धावांची भागीदारी करून ऑस्ट्रेलियाचा पराभव टाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्याआधी, कर्णधार स्टीव्ह स्मिथ (21) व मॅट रेनशॉ (15) यांना मोठी खेळी करता आली नाही.