142 उपवरांनी दिला परिचय

0

जळगाव । येथील सिंधी समाजातर्फे 14 वे अखिल भारतीय वधू-वर परिचय संमेलनाचे आयोजन संत बाबा हरदासराम समाज मंदिर गणेश नगर येथे करण्यात आले होते़ या संमेलनात राज्यासह देशभरातील उच्च शिक्षीत 142 उपवर मुला मुलींनी आपला परिचय करुन दिला. यात 86 मुलींनी तर 56 मुलांनी आपली नोंदणी केली असून आपल्या भावी जीवन साथीबाबतच्या आवडी निवडी व्यक्त केल्या़ तसेच प्राथमिक पासून ते उच्च शिक्षीत मुला मुलींसह विधवा- विदुर व दिव्यांग उपवर मुला मुलींसाठी समाजातर्फे परिचय संमेलनाचे व्यापसपीठ उपलब्ध करुन देण्यात आले होते. संत बाबा हरदासराम यांच्या आरतीने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. दरम्यान मेळाव्याप्रसंगी वधू-वर सुचीचे प्रकाशन करण्यात आले.

यांची होती उपस्थिती
माजी आमदार गुरमुख जगवानी, हरीश मायादासानी, कंचन सबवाणी व श्रमती आहूजा, चंदर प्रकाश लालवाणी, राधाकिशन कछनानी, हीरालाल कृपलानी अकोला, राम मोहनानी बूरहानपुर, हरीश चाँदनानी, भगतराम उधानी व मंगलदास उधानी, मोहनलाल दोधानी भगत बालानी, हरीश जगवानी, गुलाब चुग्रा, ओमी सचदेव, पंकज दारा , शंकर तलरेजा, नरेश कन्वना, राजकुमार वालेच, रमेश कटारिया, प्रकाश आडवाणी, सुरेश हासवानी, रमेश मतानी, विजय दारा, प्रेम कटारिया, राजकुमार पृथ्यनि, शंकर लखवाणी यांच्यासह उद्योजक देखील मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित होते़

14 वे परिचय संमेलन
या 14 व्या अखिल भारतीय परिचय संमेलनात जळगाव, औरंगाबाद, अकोला, अमरावती, बीड, मुंबई, ठाणे, यवतमाळ, परभनी, अहमदनगर, भोपाळ, वर्धा, जालना, पुणे, सोलापुर, नासिक, धुळे, नागपुर, बूर्‍हानपुर, बिलासपुर, सिकंदराबाद, छिदवारा, जबलपुर, इटारसी, अलीगड, ग्वालियर, कटनी आदींसह देशभरातील उपवर मुला मुलींसह नातेवाईकांनी हजेरी लावली होती. तसेच या मेळाव्यात वेगवेगळ्या शहरातून वधूवर सुचक मंडळांच्या पदाधिकार्‍यांनी देखील मोठ्याप्रमाणावर उपस्थिती दिली.

समाज बांधवांची उपस्थिती
दोन सत्रामध्ये मेळावा पार पडला यात पहिल्या सत्रात उपवर मुला मुलींनी आपला परिचय करुन दिला. तर दुसर्‍या सत्रात पसंत केलेल्या मुला मुलींच्या परिवाराचा परिचय आपआपसात पार पडला. निस्वार्थ भावनेने परिचय मेळाव्याचे आयोजकन केले जात असून नोंदणी झालेल्या उमेदवारांनाच या परिचय मेळाव्यात प्रवेश दिला जातो तसेच अतिशय अचूक नियोजन करण्यात येत असल्याचे आयोजकांनी सांगितले. मेळाव्याचे प्रास्ताविक अशोक रामानी यांनी केले तर सुत्रसंचालन रवी कटारिया, भूमिका किस्वाणी व संजय हिरणी यांनी केले़ त्यानंतर अवयव दान, नेत्रदानावर आधारीत लघुपट दाखविण्यात आला़ कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रमेश कटारीया, प्रकाश आडवाणी आदीनी परिश्रम घेतले. यावेळी समाजबांधवांची मोठ्याप्रमाणावर उपस्थिती होती.