जळगाव – शहरातील चौघुले प्लॉटमध्ये राहणारा वाहन चालकाने राहत्या घरात सर्व झोपलेले असतांना साडीच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी 7.30 वाजेच्या सुमारास उघडकी आली. या घटनेबाबत शनिपेठ पोलीसात आकस्मात मृत्यूची
नोंद करण्यात आली आहे. सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, शनिपेठ परीसरात असलेल्या चौघुले प्लॉटमध्ये राहणारे संतोष हिम्मतराव सोनवणे (वय- 32) यांनी राहत्या घरात आई व मुलगी झोपलेले असतांना साडीच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना सकाळी 7 वाजेच्या सुमारास उघडकीस आले आहे. मात्र आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. मयत संतोष चौधरी आगोदर सुप्रिम पाईप कंपनीत कामाला होता. त्यानंतर स्वत:ची मालवाहू वाहन घेतले होते. तसेच घरात मेसचे डबे बनवून पुरविण्याचे देखील काम करत होता. त्यांची पत्नी वैद्यकिय महाविद्यालयातील होस्टेलला नोकरीस होती.
सकाळी मुलीच्या आले लक्षात
रविवारी पत्नीस जिल्हा विद्यकिय महाविद्यालयात रात्रपाळीसाठी सोडले होते. घरी आई शकुंतला आणि दत्तक घेतलेली मुलगी खूशी होत्या. रात्री गरबा देखील खेळले. सकाळी 5 वाजेपर्यंत जागे असल्याचे गल्लीतील नागरीकांनी सांगितले. मात्र सकाळी 7 वाजेच्या सुमारास मुलगी खूशीच्या लक्षात आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. गल्लीतील नागरीकांनी खाली उतरवून जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकिय अधिकारी डॉ. विजय खेताळे यांनी मृत घोषीत केले. या घटनेबाबत शनिपेठ पोलीस स्टेशनला आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोउनि भिमराव शिंदे करीत आहे.