विवरे- रावेर तालुक्यातील विवरे खुर्द येथील दिवप पाटील यांनी सरपंचपदाचा राजीनामा दिल्याने रीक्त जागेवर निवडणूक घेण्यात आली. सरपंच पदावर कविता राजेंद्र पाटील यांची वर्णी लागली. कविता पाटील यांना सात मते मिळाली तर प्रतिस्पर्धी चंद्रकांत देशमुख चार मतांनी पराभूत झाले. नसीम बी.पिंजारी, दिलीप पाटील, योगेश चौधरी, अर्चना विचवे, अशरफ शेख, सुमन बोरनारे, उपसरपंच कविता लोखंडे, आशा हरणकार, चंद्रकात देशमुख, सुभाष पाटील आदी उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी मंडळ अधिकारी सचिन पाटील होते. ग्रामसेवक अशोक खैरनार यांचे सहकार्य लाभले. अनुचित प्रकार घडू नये म्हणुन निंभोरा पोलिस स्टेशनचे सहा.निरीक्षक प्रकाश वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार अन्वर तडवी, भास्कर कुलकर्णी, मकसुद शेख आदींनी चोख बंदोबस्त राखला.