जळगाव । शहीद भगतसिंग, सुखदेव, राजगुरु, अशफाक खान यांच्या क्रांतीकारी स्मृतीस अभिवादन करीत कामगार-शेतमजूर मोर्चाच्या मागण्यांचे निवेदन आज जिल्हाअधिकारी किशोर राजे निंबाळकर यांना देण्यात आले. जिल्हाअधिकारी कार्यालयापर्यत मोर्चाचे आयोजन सिटूच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी कॉ विजय पवार , शेख युसूफ शेख रुस्तम , कॉ उमाशंकर यादव डॉ कलावती पाटील यांच्या सह हॉकर्स तसेच कामगार बंधू सहभागी झाले होते.
हॉकर्सला स्वरंक्षण देण्याची केली मागणी
अजिंठा चौफुले व आसपासच्या टपरीधारक मेकॅनिक कामगारांच्या टपर्या लावून प्रशासनाने त्यांना बेरोजगार केल्याचा आरोप केला आहे. नॅशनल हायवे रुंदी करणाला आमचा विरोध नाही. मात्र राष्ट्रीय फेरीवाला धोरणानुसार आम्हाला जोपर्यंत रस्ता होत नाही. तो पर्यत आम्हाला दुकान लावू देण्यात यावे, एस. डी. स्टँड, गांधी उद्यान व इतर भागातील फेरीवाल्यांना स्वरक्षण देण्याची मागणी मोर्चा दरम्यान करण्यात आली आहे. विधवा व परिवक्ता महिलांना दरमहा 3000 रु पेंशन मंजूर करा. घरकुल योजनेमध्ये सर्व गरीबांचा समावेश करा, शहरी व ग्रामीण भागातील सर्व गरीबांना केंद्राचे व राज्याचे अनुदान देऊन 5 लाख रु. चे पक्के घर बांधून मिळावे. 2011 च्या सामाजिक व आर्थिक सर्वेक्षणाच्या सदोष याद्या दुरुस्त करुन वार्षिक 1 लाख रु उत्पन्नाखालील सर्वांची नावे यादीत समाविष्ट करण्यात यावे, बांधकाम व घरकाम कामगारांसाठी महामंडळाच्या योजनांची संपूर्ण अंमलबजावणी करा. बांधकाम कामगारांना त्वरीत 5000 रु. अवजारांसाठी देण्याची मागणी मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आली आहे.