चाळीसगाव । येथील शेठ ना.बं.वाचनालयात 15 ते 24 जानेवारी दरम्यान सरस्वती व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यातील दिग्गज व्याख्यात्यांचे यावेळी व्याख्यान होणार आहे. या व्याख्यानांचा लाभ घ्यावा आसे आवाहन हेमांगीताई पुर्णपात्रे, प्रितमदास रावलानी, दिपक शुक्ल, राजेंद्र चिमणपुरे, लक्ष्मिकांत पाठक, वसंत चंद्रात्रे, प्रकाश कुलकर्णी, मुकुंद करंबेळकर, मनिष शहा, राजेश ठोंबरे, सुबोध मुंदडा, मालती निकम, मधुकर कासार, मिलींद देव, वि वि देशपांडे, आण्णा धुमाळ यांनी केले आहे.
तज्ज्ञांचे लाभणार मार्गदर्शन
आज सायकल वरुन नर्मदा परिक्रमाचा जिवनानुभव वासंती जोशी (पुणे) सादर करणार आहेत. उद्या 16 रोजी ‘भारतीय महिला किती सबला, किती अबला’ या विषयावर प्रा.डॉ.वृषाली मगदुम (मुंबई) यांचे, 17 रोजी नाशिक येथील डॉ.अनिल गोसावी, 18 रोजी ‘हिंदु धर्मातील स्रीयांचे स्थान’ या विषयावर पुणे येथील गिता उपासनी, 19 रोजी प्रवीण दवने सुप्रसिद्ध सिध्द हस्तलेखन ‘वय वादळ बिजांचे’ या विषयावर,20 रोजी ‘भारताबाहेरील भारत’ या विषयावर शलाकाताई गोटखिंडीकर, 21 रोजी ‘डिजिटल प्रसार माध्यमे भविष्यातील तंत्र आणि मंत्र’ या विषयावर प्रशांत जाधव (मुंबई), ‘निसर्गाशी मैत्री का व कशी’ या विषयावर केतकी घाटे, 23 रोजी धुळे येथील मदनलाल जमनालाल मिश्रा यांचे ‘सामाजीक बांधीलकी काळाची गरज’ या विषयावर तर 24 रोजी ‘ध्यान व विज्ञान‘ या विषयावर डॉ.यशवंत वेलणकर (मुंबई) हे मधुमेह, रक्तदाब, हृदयरोग आदी व्याधींच्या मुक्तीसाठी मार्गदर्शन करणार आहेत.