जळगावच्या डॉक्टर पतीसह 13 जणांविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल
भुसावळ– लग्नात 15 लाख रुपये हुंडा न दिल्याने शहरातील माहेर व जळगाव येथील सासर असलेल्या विवाहितेचा छळ करण्यात आला. या प्रकरणी जळगावच्या डॉक्टर पतीसह 13 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी पूर्वा संदीप चौधरी (पी अॅण्ड टी कॉलनी, भुसावळ) या विवाहितेच्या तक्रारीवरुन पोलिसात गुन्हा दाखल झाला.
डॉक्टर पतीसह 13 आरोपींविरुद्ध गुन्हा
विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी डॉ.संदीप सुधाकर चौधरी, सुधाकर नारायण चौधरी, सुनंदा सुधाकर चौधरी, सुप्रिया विशाल पाटील, विशाल धनराज पाटील, कोमल वाढे, प्रभाकर नारायण चौधरी, विमलबाई रामकृष्ण चौधरी, सुभाष रामकृष्ण चौधरी, सतीश रामकृष्ण चौधरी, रामराव लक्ष्मण सुरळकर, शारदा रामराव सुरळकर, कल्पना चंद्रकांत चौधरी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. लग्नात 15 लाख रुपये न दिल्याने शारीरिक व मानसिक छळ केल्याचा आरोप विवाहितेने तक्रारीत केला आहे.