15  वर्षांची प्रतीक्षा फळाला ; शिंदखेड्यात अखेर नवजीवन एक्स्प्रेसला थांबा

0
राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरेंनी दाखवली हिरवी झेंडी ; प्रवाशांमध्ये समाधान
शिंदखेडा : तब्बल 15 वर्षांपासून नवजीवन एक्स्प्रेसला शिंदखेडा रेल्वे स्थानकावर थांबा देण्यासंदर्भात मागणीचा रेटा सुरू होता तर प्रवाशांची मागणी फळाला येऊन शनिवारी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी या एक्स्प्रेसला हिरवी झेंडी दाखविली. प्रसंगी रेल्वेचे चालक अशोक आर. पटेल व परमानंद प्रसाद यांचे स्वागत करण्यात आले तसेच उपस्थित मान्यवरांनी रेल्वेच्या इंजिनाला पुष्पहार घाऊन स्वागत केले. पहिल्याच दिवशी नऊ प्रवाशांनी सुरत, बडोदा व अहमदाबादकडे जाण्यासाठी या रेल्वेने प्रवास केला. यावेळी मनमाड-इंदौर रेल्वे मार्गादरम्यान पहिल्या फेजमध्ये नरडाणा ते धुळे टप्प्याचे काम होणार असल्याची माहिती मंत्री डॉ. भामरे यांनी दिली. यावेळी जि.प. सदस्य कामराज निकम, नगराध्यक्ष रजनी वानखेडे, प्रवासी संघर्ष समितीचे अध्यक्ष सलीम नोमानी, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील, शिंदखेडा शहरातील प्रतिष्ठीत नागरीक उपस्थित होते.