Bhusawal-Devalali Express will run from September 15 भुसावळ : कोरोना संकटामुळे सुमारे दोन वर्षांपासून बंद असलेली भुसावळ-देवळाली शटल आता एक्स्प्रेस स्वरुपात धावणार असून सुरूवातीला ही गाडी 16 सप्टेंबरपासून धावणार असल्याचे निश्चित करण्यात आले होते मात्र ही गाडी 15 सप्टेंबरपासून धावणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने कळवले आहे. गाडी क्रमांक 11114 भुसावळ-देवळाली एक्स्प्रेस 16 ऐवजी 15 सप्टेंबरपासून नियमित भुसावळ येथून सुटेल तर गाडी क्रमांक 11113 17 ऐवजी 16 सप्टेंबरपासून सुटणार आहे.
भुसावळ-वर्धा पॅसेंजर 16 सप्टेंबरपासून धावणार
गाडी क्रमांक 11121 भुसावळ-वर्धा पॅसेंजर ही भुसावळ येथून 15 ऐवजी 16 सप्टेंबरपासून धावणार आहे तर गाडी क्रमांक 11122 वर्धा-भुसावळ पॅसेंजर 16 ऐवजी 17 सप्टेंबरपासून सुटणार आहे.