15 डंपर,ट्रॅक्टर मालकांची अटक व सुटका

0

जळगाव। गिरणा नदीपात्रातून बेसुमार अनधिकृत उपसा करून बेकायदेशीरपणे वाळू नेणारे 21 डंपर, ट्रॅक्टर नदीपात्रातून वाहन ताब्यात घेवून ती सोमवारी जमा करण्यात आली होते. यानंतर याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल होऊन बुधवारी संशयीतांना दुपारी 1 वाजता ताब्यात घेत तत्काळ न्यायालयात हजर करण्यात आले. उर्वरीत सहा टॅक्टर मालक-चालकांचा अद्यापही शोध लागलेला नाही. संशयीतांना न्यायालयात हजर केल्यावर न्यायालयाने साडेसात हजारांच्या जात मुचलक्यावर संशयीतांची सुटका केली आहे.

या डंपर, ट्रॅक्टर मालकांना हजर करण्यात आले न्यायालयात
तालुका पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक सागर शिंपी यांच्या संयुक्त पथकाने वाळू माफियांविरुद्ध उघडलेल्या मोहिमेचा भाग म्हणून नदीपात्रातून सोमवारी तब्बल 21 वाहने ताब्यात घेण्यात आली. याप्रकरणी 379 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.त्यानंतर गुरुवारी 21 पैकी तब्बल 15 वाहन मालकांना अटक केली. त्यात ट्रॅक्टर (एमएच.19.8292) गोपाल नामदेव पाटील (वय-68),(एम.एच.19.1887) प्रकाश नथ्थु नन्नवरे(वय-55). एमएच.19 सी.जे.2149) महेंद्र शामराव नन्नवरे(वय-34),एमएच.19एल.4654) प्रकाश घनशाम मराठे,(एमएच.19ए.सी.8600) गणपत नन्नवरे, (एमएच.19बीजी.8600) नामदेव विलास सोनवणे, डंपर चालक(एमएच.19 बी.एम.8600)संजय पितांबर बाविस्कर, (एमएच.18-7401) रंगलाल परशुराम परदेशी, (एमडब्लूडी-3939)कालू सुका नन्नवरे,(एमएच.19झेड.2109) महादु देवराम नन्नवरे,(एमएच.19एम.4702)महेंद्र अशोक कोळी, (एम.एच.19 झेड.4736)जनार्दन सखाराम कोळी, (एमडब्लूडी-5961) भिकन रघुनाथ नन्नवरे, (एमएच.19 जे,9672)महेंद्र रतिलाल कोळी, (एमएच.19वा.8600) सुपडू मकडू सोनवणे या सर्वांना गुरुवारी अटक करण्यात येवुन लगेच न्यायालयात हजर केले असता न्या. चौधरी यांनी न्यायालयीन कोठीची सुनावणी. जामीन अर्ज दाखल केल्यावर प्रत्येकी 7 हजार 500 रुपयांच्या जातमुचलक्यावर संशयीतांना जामीन मंजुर केला.