15 दिवसांचे मूल आढळले

0

कल्याण : कल्याण पश्चिमेकडील आग्रा रोड मोहिंदर काबूल सिंग स्कूलनजिक गणेश टॉवर समोर बुधवारी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास 15 दिवसाचा चिमुकला रडत असल्याचे आढळून आले. याबाबत तत्काळ बाजारपेठ पोलिसांना माहिती दिली असता पोलिसांनी या मुलाला ताब्यात घेत अज्ञात आई बापाविरोधात गुन्हा दाखल करत त्याचा शोध सुरू केला आहे.