कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेची आर्थिक परिस्थिती बेताची झाली असून याबाबत झालेल्या बैठकीत मनपा आयुक्त पी वेलारसु यांनी उत्पन्न वाढीसाठी कठोर उपाययोजना करण्याच्या सूचना अधिकार्यांना दिल्या. या आढावा बैठकीत आयुक्तांनी पाणीपुरवठा थकबाकीची रक्कम वसूल करण्यासंदर्भात विशेष मोहिम राबवण्याचे आदेश दिले. मालमत्ता करापोटी ज्या थकबाकीदारांकडे थकीत रक्कम आहेत, अशांच्या रक्कम वसूल करणेची कार्यवाही प्रभाग क्षेत्र अधिकारी यांना देवून, मोबाईल टॉवर कंपन्याकडे असलेल्या थकबीकीची रक्कम वसूल करण्याचे आदेश करनिर्धारक व संकलक अनिल लाड यांना दिले आहेत. तसेच थकबाकीचा आढावा 15 दिवसानंतर पुन्हा घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. ओपन लॅण्ड टॅक्सप्रकरणी ज्यांच्याकडे थकबाकी आहे. अशांच्या बाबतीत देखील वसुलीची मोहिम राबवण्याच्या निर्देश दिले. महापालिकेच्या संगणक विभागाने अशा प्रकारचे मॅडयुल्स तयार करुन नागरिकांना रस्त्याबददलची माहिती व्हावी, या हेतूने हे मॅडयुल्स विकसीत करण्याच्या सूचना सिस्टीम विभागाचे उपायुक्त तोरस्कर यांना दिल्या. तसेच स्वच्छतेच्या कामात हयगय करणार्या कर्मचार्यांवर कार्यवाही करण्यात येईल अशी तंबी आयुक्तांनी दिली.