15 दिवसांपूर्वीच विवाह झालेल्या तरुणाचा अपघातात मृत्यू

0

शिरपुर- तालुक्यातील लग्न आटोपून सासरवाडीत जात असलेल्या असलेल्या दाम्पत्याची दुचाकी घसरुन झालेल्या अपघातात पतीचा मृत्यू झाला असून पत्नी गंभीर आहे. उमेश हिम्मत कोळी असे मयताचे नाव आहे. उमेशचे 9 मार्च रोजी रजनीबरोबरच ब्राम्हणे येथे विवाह झाला होता. अंगावरची हळद फिटत नाही तोच अपघाताने त्याच्यावर झडप घातली.
उमेश हा पत्नी रजनीसह बाम्हणे ता.शिंदखेडा येथे लग्नासाठी आला होता. 22 रोजी दोघे हळदीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. यानंतर रात्री 11:30 वाजेच्या सुमारास सासरवाडी अंतुर्ली येथे जात असतांना तर्‍हाड कसबे ते भटाणे रस्त्यावर अचानकपणे मोटारसायकल घसरली त्यात उमेशला डोक्याला जबर मार लागला तर पत्नी रजनी कोळी ही जखमी झाले. त्यांना हर्षल कोळी याने शिरपुर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान उमेशला डॉ. जैन यांनी मयत घोषित केले. याप्रकरणी शिरपुर शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोकॉ पी.एस.पाटील करीत आहे. उमेशच्या पश्चात वडील,आई,पत्नी असा परिवार आहे.