15 लाख कोटी जमा झाले! पांढरे किती, काळे किती?

0

 मुंबई : पन्नास दिवस लोकांनी पंतप्रधानांच्या मागणीनुसार त्रास काढला, तरी त्यातून किती काळापैसा हाती लागला ते आजही रहस्य आहे. वर्षाच्या अखेरच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राला उद्देशून भाषण केले, तेव्हा ते त्याचा काही तपशील देतील ही अपेक्षा फोल ठरली. पण आता एका आर्थिक वाहिनीने दिलेल्या माहितीनुसार मुदत संपण्यापर्यंत 14 लाख 97 हजार कोटी रुपयांच्या बाद नोटा सरकारकडे जमा झालेल्या आहेत. त्यापैकी किती पैसा पांढरा आणि किती पैसा काळा, त्याचा खुलासा मात्र होऊ शकलेला नाही. लोकांनी कशासाठी त्रास सोसला, त्याचे उत्तर कोणीतरी द्यायला हवे आहे.

या पन्नास दिवसात 32 मोठ्या धाडी घालण्यात आल्या असून, त्यात 200 कोटी रुपयांचा काळापैसा हाती लागल्याचे सांगितले जाते. पण इतक्या रकमेसाठी नोटाबंदी केलेली नव्हती हे उघड आहे. कदाचित जमा झालेली सगळी रक्कम अजून नव्या नोटांमध्ये परत गेलेली नसल्याने, खरे आकडे मिळायला वेळ लागत असावा. असा एक अंदाज आहे.