15 लाख ‘जुमला’ होता, 72 हजार सत्य आहे – राहुल गांधी

0

वर्धा – पंतप्रधान नरेंदी मोदी यांनी प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख जमा करण्याचे आश्वासन दिले होते, आम्ही गरिबाच्या खात्यात 72 हजार रुपये जमा करणार आहोत. काँग्रेसचे आश्वासन हे सत्य आहे. ते भाजपाच्या 15 लाख रुपयांप्रमाणे जुमला नाही, असा टोला राहुल गांधी यांनी लगावला आहे.

राहुल म्हणाले की, 2014 मध्ये नरेंद्र मोदी यांनी प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रुपये जमा होणार, असे आश्वासन दिले होते. मात्र ते जमा झालेच नाही. जे शक्य आहे तेच आश्वासन काँग्रेसने दिले आहे. 2019च्या आमच्या पहिल्या वर्षांत कृषीसाठी स्वतंत्र अर्थसंकल्प असेल. शेतकर्‍यांना वर्षभरात काय देणार, त्याबाबत ठोस तरतूद राहील. सर्वोत्तम अर्थतज्ज्ञांनी वार्षिक 72 हजारांचा आकडा दिला आहे. त्यामुळे देशाची अर्थव्यवस्था नष्ट होणार नाहीच. उलट त्यास गती येईल, असे गांधी म्हणाले. त्यांना त्यांच्या खोट्या आश्वासनांचा पश्चात्ताप होत नाही. मात्र आता जनताच त्यांना धडा शिकवेल. हिंदुस्तान बोलत नाही, शांत बघतो. मात्र निवडणुकीत झटका देतो. सर्जिकल स्ट्राइकचे श्रेय पंतप्रधान घेतात, त्यांना रायफ ल तरी पकडता येते का? त्यांनी रेसकोर्सवर बसून युद्ध केले काय, असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला.