खा. आढळराव-पाटील : शिरूर मतदारसंघातील कामांचा आढावा
हडपसर : शिरूर मतदारसंघाचे नेतृत्व करताना संसदेत चमकदार कामगिरी केली. 15 वर्षाच्या काळात 14 हजार कोटींचा निधी मंजूर करून घेतला. पुणे ते नाशिक हडपसर मार्गे नियोजित रेल्वेमार्गास मंजुरी मिळाली असून चार वर्षात रेल्वेमार्गाचे काम पूर्ण होईल, विरोधकांनी आता दिशाभूल करण्याचे काम चालविले आहे, पण जनता माझ्या पाठीशी असल्याने लोकसभा निवडणुकीत चौथ्यांदा बाजी मारणार असा विेशास शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांनी व्यक्त केला.
केशवनगर येथील गुरुकृपा सोसायटीच्या 15 लाख रुपये निधीतून होणार्या रस्त्याच्या भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी नगरसेविका पूजा कोद्रे, समीर तुपे, नगरसेवक प्रमोद भानगिरे, नितीन बांदल, अमोल हरपळे, विक्रम लोणकर, दिलीप व्यवहारे, प्रभाकर कदम, राम खोमणे, अनिल लोणकर, अभियंता देवेन मोरे उपस्थित होते.
सोशल मीडियावरून टीका
खा. आढळराव म्हणाले, निवडणूक जवळ आल्यावर सोशल मीडियावर विरोधक टीका करत सुटलेत, पण टीकाकारांना माझे आव्हान आहे की पूर्वीच्या खासदारांच्या कामाची आणि माझ्या कामाची तुलना करून पाहा, कोंढवा पाणीपुरवठा योजना मार्गी लावण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले, महापालिका, राज्यशासन, केंद्र शासन या तिन्ही ठिकाणी नागरी प्रश्न सोडवण्याकरिता खासदार म्हणून काम केले आहे. विरोधक आम्ही केलेल्या कामाचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करीत आहेत. संयोजन मुकेश भाट, नितीन बांदल, देवेंद्र भाट, हरिभाऊ मोटे, विजय खडके, विजय रासकर, रमण रेड्डी, अविनाश आबनावे, गौरव धिवार व गुरुकृपा सार्वजनिक मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केले.