15 वर्षांपासून क्रीडाभवन बंद

0

शहादा । शहरातील कै. काशीनाथ पाटील मार्केटला लागुन वनविभाग कार्यालयासमोरील क्रीडा भवन गेल्या 15 वर्षापासुन बंद असुन पुर्णत; दुर्दशा झाली आहे. केवळ क्रीडा भवन नावाला राहीले आहे. गेल्या पंधरा वर्षांपुर्वी तत्कालीन भाजपा आमदार प्रतापराव सोनवणे यांचा निधीतुन ह्या क्रीडाभवनाची उभारणी केली होती. हे क्रीडाभवन शहादा शहरात त्यावेळी एकमेव होते. याची स्थापना 1985 मध्ये करण्यात आली होती. त्यात अनेक क्रीडाप्रेमींचा व सामाजीक कार्यकर्त्यांचा समवेश होता. त्याला चालना म्हणुन भाजपा कार्यकत्यार्ंनी पाठपुरावा करुन आमदार प्रतापराव सोनवणे यांचा निधीतुन क्रीडा भवनाचे बांधकाम केले होते. मोठ्या थाटात त्याचे उद्घाटन झाले होते. त्यात टेबल टेनीस, बॉल टेनीस, बॅडमिंट्न सह इतर खेळ खेळले जात होते.

पुन्हा कार्यन्वित करा
क्रीडाभवनाची झालेली दुर्दशा म्हणजे एक प्रकारे खेळ भावनेची अवहेलना म्हणावी लागेल. गेट उघडताच येणार नाही एवढा कचर्‍याचा ढिगारा तयार झाला आहे. कचर्‍याच्या गराड्यात अडकलेल्या क्रिडा भवनवर लावण्यात आलेला फलक काढुन घ्यावा अशी मागणी होत आहे. लोकप्रतिनिधी व सामाजीक कार्यकत्यार्ंनी तसेच शहरातील क्रीडा प्रेमींनी हे क्रीडा भवन पुन्हा कार्यांवित करण्याचा प्रयत्न करावा.

गांधी वसाहतीतील क्रीडा संकुल कुचकामी
आ. उदेसिंग पाडवी, नगराध्यक्ष मोतीलाल पाटील यांनी याला चालना द्यावी. याबाबत चौकशी करून क्रीडा प्रेमींना न्याय द्यावा अशी मागणी आहे. दुसर्‍या बाजुला गेल्या एक महिन्यापासुन गांधीनगर वसाहतीला लागुन भव्य असे क्रीडा संकुलाचे बांधकाम होवुन पालकमंत्री जयकुमार रावल यांचा हस्ते उद्घाटन होवुन कुचकामी ठरले आहे. सध्या त्याला कुलुप आहे. 65 हजार लोकसंख्या असलेल्या शहरातील क्रीडाप्रेमींना व खेळाडुंना एकही क्रीडासंकुल अथवा क्रीडा भवन नसणे ही एक मोठी शोकांतिका आहे.

क्रीडाभवन ठरले मृगजळ
पूर्वी रोज क्रीडाप्रेमींनी खेळाडुनी हे क्रीडा भवन भरलेले असयचे. हे क्रीडा भवन एक ते दिड वर्ष सुरु राहिले व नंतर हळुहळु दुर्लक्षित झाले. कोणीही लक्ष द्यायला तयार नव्हते. पर्यायाने आजचा परिस्थीतीत क्रीडाभवन बंद आहे. पुर्णता त्याची दखल घेतली गेली नाही. क्रीडाप्रेमींना केवळ काही काळापुरते हे क्रीडाभवन उपयोगी ठरले. सध्या हे क्रीडाभवन शहादेकरांसाठी एकप्रकारचे मृगजळच ठरले. गेल्या अनेक वषार्ंपासुन क्रीडा भवनाच्या आवारात सर्वत्र घाण पसरली आहे. अक्षरशः मुख्य गेटला उकीरड्याचे स्वरूप आले आहे. कै. काशीनाथ पाटील मार्केटमधील केरकचरा तेथे टाकला जातो.