मुंबई । आयडीबीआय फेडरल लाइफ इंशुरन्स आयोजित मुंबई अर्ध मॅरेथॉन स्पर्धेला यावेळी उस्फुर्त प्रतिसाद मिळाला आहे. 20 ऑगस्ट रोजी मुंबईतील काळा घोडा येथून सुरू होणार्या या शर्यतीसाठी सुमारे 15 हजारांपेक्षा जास्त धावपटूंनी विविधी गटात सहभाग घेतला आहे. या स्पर्धेचा सदिच्छादूत सचिन तेंडुलकर धावपटूंना झेंडा दाखवणार आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने आयोजकांतर्फे मुंबईतील गरजू गरीब मॅरेथॉन धावपटूंसाठी स्पोर्ट्स शुज देण्यात येणार आहेत. आयोजकांच्या या भूमिकेचे स्वागत करताना स्वत: सचिननेही त्यात 100 स्पोर्ट्स शूजची भर टाकली. या अर्ध मॅरेथॉन स्पर्धेत आघाडीचे धावपटू धावणार आहेत.
याशिवाय 77 वर्षीय खुशरू पटेल यांच्यासह किडनी ट्रांसप्लाटच्या यशस्वी शस्त्रक्रियेला सामोरे गेलेल्या एका रुग्णाचा समावेश आहे. आयडीबीआय फेडरल लाईफ इंशुरन्सतर्फे भारतातील मुंबईसह कोची, नवी दिल्ली आणि कोलकात्यात अर्ध मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केली जाते.